छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत २ माओवादी ठार झाले. या जिल्ह्यात इंद्रावती जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात येत होती. त्यादरम्यान ही चकमक झाली. सुरक्षादलांनी दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शोधमोहीम अद्याप सुरु आहे.
Site Admin | April 12, 2025 2:34 PM
छत्तीसगढच्या चकमकीत २ माओवादी ठार
