चांदोबामागेआज काही वेळासाठी शनी लपणार असल्याची घटना खगोलप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आज रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी चंद्र आणि शनी एकाच रेषेत राहणार आहेत.
साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत शनीचा हा लपंडाव अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. चंद्राद्वारे शनीला ग्रहण हा एका साखळीचा भाग असून ही घटना साधारणपणे दर १८ महिन्यांनी होते.