गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.