डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं होतं. आनंदाचे अंतरंग – मदर तेरेसा, ओॲसिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पाऊले, मुलांचे बायबल, सृजनाचा मळा ही फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं, तसंच ‘नाही मी एकला’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फादर दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा