डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

मुंबईतल्या खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. मुंबईतल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालण्याचा महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय २६ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा