केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातल्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मानवतावादी दृष्टीनं मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संस्थांचे कर्मचारी दुर्घटना स्थळी मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करत आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा तपास करण्यासाठी एक झेव्हर रडार, चार रेको रडार आणि विशेष तज्ञ दिल्लीहून मागवण्यात येत असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आजच्या दिवसभर ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह काढण्यावर तसंच अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्यावर भर दिला जाईल, असं लष्करानं स्पष्ट केलं.
Site Admin | August 3, 2024 12:53 PM | kerla