मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. २०२४ मधे राज्यात २ हजार ६३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना हे आवाहन केलं.
शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार म्हणाले.
Site Admin | March 15, 2025 4:01 PM | central government | farmers | Sharad Pawar
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं – ज्येष्ठ नेते शरद पवार
