डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंदीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद

केंद्र सरकारच्या धोरणानुसार डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठातलं संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा तसंच पाणी आणि खत वापराचं सुयोग्य नियोजन केलं जाईल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितलं. देशात डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी काय काय करता येईल याविषयी केंदीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. त्यात महाराष्ट्राची बाजू मांडताना मुंडे बोलत होते. 

कडधान्यांचा उत्पादन खर्च आणि किमान हमी भाव या दरांतली तफावत कमी करण्यासाठी आणि डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं डीबीटीद्वारे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे कृषिमंत्री उपस्थित होते.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा