ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं आज भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वसमावेशक विकास आणि जागतिक कल्याणासाठी सागरी क्षेत्रात सुरक्षित वातावरण कायम ठेवण्याच्या विविध मार्गांवर यावेळी चर्चा झाली. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातली सुरक्षा, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण समन्वय, यासारख्या सामायिक हिताच्या मुद्द्यांचा यात समावेश होता.
Site Admin | August 13, 2024 1:41 PM | India-Australia
कॅनबेरा इथं सहाव्या भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन
