डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं होईल, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईतल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येत्या शुक्रवारी आपल्या दालनात बैठक बोलावली आहे. आमदार आशीष शेलार यांनी आज विधानसभेत याबद्दल तक्रार मांडली होती.
राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली. ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील असं ते म्हणाले.

दरम्यान सकाळी कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भ्रटाचाराच्या मुद्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. हे सरकार अदानीसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या घोषणाबाजीतून केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा