डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, 779 मोबाइल सिमकार्डसह 23 मोबाइल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केले.

 

 

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करून त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं जातं. अशा गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यामधील रक्कम ऑनलाइन वळती करून फसवणूक केली जाते.ठाण्यातील सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे यांना अशा 16 गुन्ह्यांचा एकत्रित तपास करीत असताना आरोपींनी फसवणुकीसाठी पीडितांसोबत व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे संपर्क केलेल्या मोबाइल क्रमांकाच्या सीडीआर आणि व्हॉट्सॲप मेसेजिंगची माहिती मिळवली.

 

30 मोबाइलमधून वेगवेगळ्या राज्यातील 2600 मोबाइल सिमकार्डवरील व्हॉट्सॲप छत्तीसगड, त्रिपुरा आणि इतर ठिकाणांहून कार्यरत असल्याची, तसंच व्हॉट्सॲप आयपी हाँगकाँगमधील असल्याचीही माहिती मिळाली. यासंदर्भात भारतात सिमकार्ड खरेदी करून ती दुबईमध्ये आर्थिक फसवणुकीसाठी टोळीला विकणारा दिल्लीचा भाईजान ऊर्फ हाफीज लईक अहमद यालाही अटक करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा