उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आज नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. उमेद अभियानाला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातला शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं, समुदाय संसाधन व्यक्तींना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा द्यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.
त्यासाठी ३ ऑक्टोबरपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. बीडमधेही हे आंदोलन सुरु आहे.