केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि बौद्ध महासंघाने संयुक्तरित्या उद्या मुंबई इथे भविष्यातील जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाचा मध्यम मार्ग या विषयावर एक दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात ही परिषद होणार असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आधुनिक काळात बौद्ध धम्माची भूमिका आणि प्रासंगिकता, मानवी मनातील जाणीवांशी संबंधित तंत्राचे महत्त्व आणि नव्या युगाचे नेतृत्व आणि बौद्ध धम्माची अंमलबजावणी अशा तीन विषयांवरच्या चर्चासत्रांचा या परिषदेत समावेश असेल.
Site Admin | September 13, 2024 6:46 PM