उत्तरप्रदेशातल्या पिलिभीत आणि लखीमपूर खेरी जिल्ह्यात पुरामुळे शेतजमिनीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार जमिनीचे पट्टे देणार आहे. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पिलिभीत आणि लखीमपूर खेरी जिल्ह्यात सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नद्या उथळ झाल्याने त्यांचं खोलीकरण करण्याची गरज असल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
अति मुसळधार पावसामुळे लखिमपूर खेरी, पिलिभीत, श्रावस्ती, कुशीनगर, बलरामपूर आणि गोंडा जिल्ह्यात शेतजमिनींचं मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहराने सांगितलं.