डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. सुर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे.

 

संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता इथं होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा