आसाममधील मोरीगाव इथं टाटाच्या सेमीकंडक्टर युनिटचे बांधकाम सुरू झालं आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत याबद्दल अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले की, या एककामध्ये 27 हजार कोटी रुपयें गुंतवणूक केली जाईल आणि 15 हजार प्रत्यक्ष आणि 11 ते 13 हजार अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होतील. या भव्य सेमीकंडक्टर कारखान्यातून दररोज चार कोटी 83 लाख सेमीकंडक्टर चिप्स तयार होणार आहेत. या चिप्सचा वापर ईलेक्टीक वाहनं, दळणवळण आणि संजालांच्या पायाभूत सुविधांमध्ये केला जाईल.