आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.
राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.