इस्राएल मधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी केली आहे. इस्राइलमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा असं या सुचनेत म्हटलं आहे. इस्राइलने हिजबूल गटाचा सर्वोच्च कमांडर फुआद शुक्र याला ठार केलं, त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. गोलान हाइट्समधे झालेल्या हल्ल्याचा आपण बदला घेतल्याचा दावा इस्राइलने केला आहे. इस्राइलमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे तसंच स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा नियमांचं पालन करावं असं आवाहन भारतीय दूतावसाने केलं आहे.
Site Admin | August 3, 2024 10:22 AM | Israel
आवश्यकता नसल्यास स्राइलचा प्रवास टाळा
