राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण १ हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या १ हजार ६४६ तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.
सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाते.