आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करून सरकारनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला बगल दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सर्व योजना फसव्या असून हे सरकार विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
Site Admin | August 11, 2024 3:28 PM