राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमधे आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे १९९८ मध्ये केली आहे.