केंद्र सरकारनं असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्ता वाढवला आहे. यामुळं अ श्रेणीतल्या कामगारांना दिवसाला १ हजार २८ रुपयांऐवजी १ हजार ३५ रुपये मिळतील. ब श्रेणीतल्यांना ९४८ रुपयांऐवजी ९५४ रुपये तर क श्रेणीतल्या कामगारांना ८६२ रुपयांऐवजी ९६८ रुपये दिवसाला मिळतील. १ ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत.
Site Admin | September 26, 2024 8:10 PM