उत्पादन शुल्क प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधातल्या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. 21 जूनला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता.
आज दुपारी न्यायमुर्ती सुधीर जैन यावर निकाल देतील. न्यायालयानं 20 जूनला केजरीवाल यांना जामिन दिल्यानंतर ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयानं जामिन आदेशाला स्थगिती दिली होती.