अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं तिथल्या दूरसंचार सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करायचं ठरवलं आहे. अपेक्षित सुधारणांमुळं अमरनाथ यात्रेतला लखनपूर ते काझीगंड तसंच काझीगंड ते पहलगाम आणि बलताल पर्यंतचा पट्टा 2G, 3G आणि 4G सुविधांनी युक्त होणार आहे. या अद्यावत सुधारणा करण्यासाठी दूरसंचार विभागानं एअरटेल, बीएसएनएल तसंच रीलायन्स जिओ सारख्या मोठ्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
Site Admin | July 8, 2024 8:10 PM | अमरनाथ यात्रा | दूरसंचार