१८व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरु होत असून अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील अशी आशा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहे. संसदेची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याच्या कामी सर्व सदस्य सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे. या अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. राज्यसभेचं अधिवेशन २७ जूनपासून सुरु होणार असून दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. आधिवेशन येत्या ३ जुलै पर्यंत चालणार आहे.
Site Admin | June 15, 2024 1:18 PM | अधिवेशन | किरेन रिजिजू
अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील – मंत्री किरेन रिजिजू
