मुंबईसह कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातल्या अन्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्व यंत्रणांनी हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घ्यावी आणि त्यानुसार नियोजन करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधं आणि आवश्यक साहित्य तसंच पर्यायी निवारास्थानं उपलब्ध करून ठेवावीत. जनावरांच्या स्थलांतराचीही व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Site Admin | July 22, 2024 10:34 AM | एकनाथ शिंदे | पाऊस