अंदमान-निकोबार द्वीप समूहांच्या प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, करैकल, केरळ, माहे आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातही या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पुढले २ ते ३ दिवस वातावरणात धुरकं आणि काही प्रमाणात धुकं राहील, तर उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते दाट स्वरूपाच्या धुक्याचा थर राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.