पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरात वारीच्या वेळी होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपुरात घेण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचं प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे. चेहरे ओळखण्याच्या प्रणालीद्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेल्यांचा शोध घेणं शक्य होणार आहे. तसंच, एखाद्या विशिष्ट ठिकाणी गर्दीची घनता जास्त आढळल्यास त्याविषयी तात्काळ सूचना मिळू शकणार आहे.
Site Admin | April 8, 2025 7:33 PM | AI | Pandharpur wari
विठ्ठल मंदिरात वारी वेळी होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थानासाठी एआयचा वापर करणार
