महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
9:22PM

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चिन्ह भाषा दिवस’ साजरा

airnewsalerts
अपंग व्यक्तींचं सक्षमीकरण विभागा अंतर्गत भारतीय साइन लँग्वेज, अर्थात चिन्ह भाषा संशोधन आणि सक्षमीकरण संस्थेनं आज नवी दिल्ली इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘चिन्ह भाषा दिवस’ साजरा केला. देशभरातल्या २०० पेक्षा जास्त संस्था यात सहभागी झाल्या. 

श्रवण अक्षम  व्यक्तींच्या जीवनातल्या भारतीय चिन्ह भाषेच्या महत्वाबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणं हा चिन्ह भाषा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. ‘चिन्ह भाषा आपल्याला एकत्र आणते’ ही यंदाच्या चिन्ह भाषा दिनाची संकल्पना आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. संपूर्ण जग आज भारताच्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा अवलंब करत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून आज जगभरात साजऱ्या होत असलेल्या चिन्ह भाषा दिनामधून याची खात्री पटत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

या कार्यक्रमाला संबोधित करताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री प्रतिमा भौमिक म्हणाल्या की, दिव्यांग व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच सक्षमीकरण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहेत असं त्या म्हणाल्या. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1