महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 24, 2022
8:14PM

सातत्यानं रोजगार मेळावे भरवून केंद्र सरकार हजारो युवकांना रोजगार मिळवून देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

@ddsahyadrinews
देशात विविध ठिकाणी गेले काही दिवस सातत्यानं रोजगार मेळावे भरवण्यात येत असून केंद्र सरकार हजारो युवकांना रोजगार मिळवून देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गोव्यात आयोजित रोजगार मेळ्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. त्यावेळी ते बोलत होते.

रोजगार मेळ्याची संकल्पना गेल्या धनत्रयोदशीला  प्रधानमंत्र्यांनी सुरू केली. केंद्र सरकारच्या पातळीवर १० लाख रोजगार मिळवून देण्याची ही मोहीम असून त्या अंतर्गत आतापर्यंत प्रधानमंत्र्यांनी गुजरात, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्रात रोजगार मेळ्यांना संबोधित केलं आहे.

नवीन भरती झालेल्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मयोगी प्रारंभ हा उपक्रमही त्यांनी सुरु केला आहे. या मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७१ हजार नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना राबवून राज्याचा विकास आणि रोजगारात वाढ ही उद्दिष्टं साध्य करायची आहेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी युवकांना या व्हिडीओ संदेशात केलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1