महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
9:16PM

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेन संघर्षावरून रशियाविरोधात अमेरिकेनं नोंदवली कडक टीका

airnewsalerts
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेनं, युक्रेन संघर्षावरून रशियाविरोधात कडक टीका नोंदवली आहे. रशियाला तणाव कमी करायचा नसून तो आणखी वाढवायचा आहे, तसंच रशिया आंतरराष्ट्रीय व्यवस्था उध्वस्त करत आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं आहे. रशियाची अणु युद्धाची धमकी ताबडतोब थांबायला हवी, असा स्पष्ट संदेश सुरक्षा परिषदेच्या प्रत्येक सदस्य देशानं द्यायला हवा, असं ते म्हणाले.  

युक्रेनमधल्या ताज्या घडामोडी धोकादायक आणि अस्वस्थ करणाऱ्या असल्याचं  संयुक्त राष्ट्रांचे महासचीव अँटोनियो गुटेरस यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात म्हटलं. तर युक्रेन हा एक निरंकुश देश झाल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांनी सुरक्षा परिषदेला संबोधित करताना म्हटलं. पाश्चिमात्त्य देशांनी  युक्रेनला लष्करी सहकार्य केल्यामुळे युद्ध लांबल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1