महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
11:15AM

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहोळ्यात वारकरी दिंड्यांची वाहनं सोडून अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी

Air
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहोळा प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत वारकरी दिंड्यांची वाहने सोडून अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर आळंदीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. येत्या १२ तारखेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. येत्या रविवारी माउलींच्या पालखी सोहोळ्याचे प्रस्थान होणार असून त्या दिवशी रात्रीचा मुक्काम समाधी मंदिराशेजारील आजोळ घरीच राहणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पालखी पुण्यनगरीत दाखल होणार आहे. दरम्यान राज्यातून तसंच राज्याबाहेरुनही मोठ्या संख्येनं वारकरी भाविक अलंकापुरीमध्ये दाखल होऊ लागले असून इंद्रायणीचा काठ विठू माऊलीच्या गजरानं दुमदुमून गेला आहे. 
  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1