महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
11:18AM

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

आकाशवाणी

जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली असून शिखर धवन हा या दौऱ्यात संघाचं नेतृत्व करणार आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा उपकप्तान असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 ते 25 जुलैदरम्यान तीन एकदिवसीय आणि वीस षटकांचे तीन सामने खेळवले जाणार आहेत.

शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन, संजू सॅमोन, युजवेन्द्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरून चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरीया यांचा 20 जणांच्या पथकात समावेश आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8