महत्वाच्या घडामोडी
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस            हिंदुत्वाचा विचार पुढं नेत महाराष्ट्राचा विकास करत राहण्याची एकनाथ शिंदे यांची ग्वाही            २ आणि ३ जुलैला राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन            भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं - प्रधानमंत्री            निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल यांच्याकडून व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२० प्रसिद्ध           

Feb 14, 2022
8:04PM

विसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ च्या थीमची घोषणा

Twitter
विसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात पिफ २०२२ च्या थीमची घोषणा आज करण्यात आली. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे आणि प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर आधारित या वर्षीची संकल्पना असेल, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. 

हा महोत्सव ऑनलाईन तसंच  ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. यंदा पिफ मधील चित्रपट तीन ठिकाणच्या आठ पडद्यांवर दाखवले जाणार आहेत. ऑनलाइन माध्यमातून २६ निवडक चित्रपट दाखवले जातील तर ऑफलाईन माध्यमातून १२० चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1