महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
8:04PM

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज ५ जिल्ह्यात ३६ ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन

Air
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज राज्यातल्या ५ जिल्ह्यात ३६ ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं. या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नाशिक, नंदुरबार, पालघर, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या ही यात्रा सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात जलधारा आणि नंदगाव तांडा इथं गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात १५३ नागरिकांना  आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला.  १५१ नागरिकांची सिकलसेल तपासणी केली, तर २२ जणांची उच्च रक्तदाब, ११ जणांची मधुमेह आणि १३ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यावेळी १५० ग्रामस्थांची आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्यात आली, तर ८० ग्रामस्थांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आलं.विकसित भारत संकल्प यात्रा गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यात वघाळा इथं पोहचली त्यावेळी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी प्रणाली बनकर यांनी सांगितलं…. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1