महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर            रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे            विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद            केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली            ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन           

Sep 21, 2023
8:18PM

लोकसभेत चांद्रयान-३ चे यश आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या इतर यशाबद्दल चर्चा

AIR
लोकसभेत आज चांद्रयान-३ चे यश आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या इतर यशाबद्दल चर्चा झाली. विकसित देश चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना भारतानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यात यश आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चा सुरू करताना म्हटलं. इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचंही त्यांनी अभिनंदन केलं. चंद्रावर अलगद उतरुन भारतानं नवा इतिहास रचल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले. त्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातल्या पंडित जवाहरलाल नेहरू, विक्रम साराभाई, सतिष धवन यांच्या योगदानाची आठवण काढली. द्रमुकचे ए राजा, तृणमृल काँग्रेसचे सौगत रॉय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनीही इस्रोचं कौतुक केलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1