महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित            अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे            गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी            यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर            १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक           

Jun 08, 2023
8:13PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं द्वैमासिक धोरण जाहीर

AIR

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक आर्थिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. व्याज दरातही कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती, बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. स्थायी ठेव सुविधा अर्थात एसडीएफ दर सहा पूर्णांक २५ शतांश टक्के कायम ठेवला आहे. आधीच्या सहा पूर्णांक ७५ शतांश टक्यांचा सीमांत स्थायी सुविधा आणि बँक दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राप्त मुल्यांकनानुसार २०२३-२४ मध्ये महागाई चार टक्क्यांच्या वर राहील तर सर्व घटकांचा विचार करुन चलनवाढ २०२३-२४ साठी पाच पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं. आरबीआयनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर मे च्या तिसऱ्या आठवड्यापासून चलनातील घट आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे प्रणालीतली तरलता वाढली आहे. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोन हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्यामुळं या तरलतेत आणखी वाढ झाल्याचं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक गेल्या सहा जून पासून मुंबईत सुरू होती. त्यानंतर आज द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं. आरबीआयनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची झालेली ही पहिलीच बैठक होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1