महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
8:48PM

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान 'शाश्वत विकास ध्येयांचं स्थानिकीकरण’ याविषयावरच्या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्र्याचं मार्गदर्शन

@MahaDGIPR
राज्यासह देशभरात वर्ष 2022-23 पासून ‘पंचायतराज यंत्रणेच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या ध्येयांची’ प्रभावी अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान 'शाश्वत विकास ध्येयांचं स्थानिकीकरण’ याविषयावरच्या राष्ट्रीय कार्यशाळेत ते आज बोलत होते. 

ही ध्येयं साध्य करण्यासाठी आपलं राज्य आणि पंचायतराज संस्थांचं  योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असं ते म्हणाले. या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं   निश्चित केलेल्या  संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य सरकारनं  पुढाकार घेतला आहे.

या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता आणि शुद्धपाणी याविषयावर सखोल चर्चा आणि उहापोह होऊन त्याचा फायदा गावांमध्ये यासंदर्भातल्या योजनांची अंमलबजावणी आणि जाणीवजागृतीसाठी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या  दुर्बल, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू असून राज्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन हातात हात घालू काम करत  आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1