महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:36PM

राष्ट्रपती गुजरातमध्ये श्रीमद राजचंद्र मिशनला देणार भेट

AIR
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात धरमपूर इथल्या श्रीमद राजचंद्र मिशनला भेट देणार आहेत. धरमपूरमध्ये त्या गुजरात मधल्या विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज संध्याकाळी जयपूरला रवाना होतील. या भेटीदरम्यान त्या उद्या मेहंदीपूर बालाजी आणि बेनेश्वर धामला भेट देणार आहेत.

राष्ट्रपती उद्या बेनेश्वर धाम इथं विविध स्वयं-सहायता गटांशी संबंधित आदिवासी महिलांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याकरता आज आणि उद्या जयपूरमध्ये राजभवन ते विमानतळापर्यंतच्या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1