महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 24, 2022
7:46PM

राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ६०० च्या खाली

आकाशवाणी
राज्यात कोविड १९च्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६०० च्या खाली आली आहे. आज राज्यात ५२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज कोरोनामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. 

राज्यात आतापर्यंत ८१ लाख ३५ हजार ४५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७९ लाख ८६ हजार ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १ लाख ४८ हजार ४०४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी सर्वाधिक २२५ रुग्ण पुण्यात तर ८७ रुग्ण ठाण्यात आहेत. मुंबईत ८२ रूग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १७ शतांश टक्के तर मृत्यू दर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1