महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
2:30PM

राजस्थान, तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचा धडाका

AIR
विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस उरले असल्यानं राजस्थान आणि तेलंगणमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. प्रमुख प्रचारकांच्या सभा, रोड शो धडाक्यात सुरू आहेत.

 राजस्थानात प्रचारासाठी तीनच दिवस राहिले असून  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अंता, कोटा शहर आणि करौली  मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी जयपूरमधे त्यांचा रोड शो होईल. त्याकरता चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर विशेष तयारी करण्यात आली आहे.   पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा धोद, फतेहपूर आणि श्रीडुंगरगड इथं प्रचार सभा घेतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, आणि गजेंद्र सिंग शेखावत तसंच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्व सरमा, शिवराज सिंग चौहान राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांच्या ही प्रचारसभा होणार आहेत.

तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यासह इतर नेत्यांच्या प्रचारसभा आज होणार आहेत. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. बसपा प्रमुख मायावती, रालोद अध्यक्ष जयंत चौधरी या ज्येष्ठ नेत्यांच्या सभाही त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1