महत्वाच्या घडामोडी
राज्यसभेत महिला आरक्षणाबाबत चर्चा            न्यायालयात टिकणारं आरक्षण धनगर समाजाला देण्याची राज्य सरकारची भूमिका            रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेकडून १० पटीने वाढ            कॅनडामधल्या व्हिसा सेवा भारताकडून तात्पुरत्या स्थगित            आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघ विजयी           

Sep 23, 2022
9:10PM

रशिया-यूक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्‍ट्रीय समिति नेमण्याचा मेक्सिकोचा संयुक्त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव

आकाशवाणी
रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समावेश असलेली एक अन्‍तर्राष्‍ट्रीय समिति नेमण्याचा प्रस्ताव, मेक्सिकोनं संयुक्त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेला दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरस, नरेंद्र मोदी, पॉप फ्रांसिस यांच्यासह अन्य नेत्यांना समाविष्ट करून एक समिती नेमली जावी, असं मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रॉर्ड हा प्रस्ताव मांडताना म्हणाले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या समरकंद इथं झालेल्या २२ व्या बैठकीदरम्यान अलीकडेच झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्याचं युग हे युद्धाचं युग नसल्याचा सल्ला मोदी यांनी या भेटीदरम्यान पुतीन यांना दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या या सल्ल्याची  अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी देशांनी प्रशंसा केली होती.   

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1