महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:42PM

युवा फोरमतर्फे धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना फूड पॅकेटचा पुरवठा

आकाशवाणी
कोरोना साथीची दुसरी लाट आता ओसरत आहे. पण या दुसर्‍या लाटेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात मोठी रुग्णवाढ होवून आर्थिक आणि जिवीत हानी झाली. कोरोनाच्या संकट काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे धुळे शहरातील सर्वच हॉटेल बंद होते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन पूर्णवाद युवा फोरमतर्फे धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड आणि इतर आजारांच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना फूड पॅकेटचा पुरवठा करण्यात येतो आहे.

या कामासाठी श्री शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष महेश मुळे आणि कार्यकारिणीने मनकर्णिका भवन उपलब्ध करून दिले. महिनाभरापासून दररोज २०० जणांसाठी मनकर्णिका भवनात अन्न शिजवून त्याचे पाकीट तयार करून ते रुग्णांच्या नातलगापर्यंत पोहोचवण्याचे काम पुर्णवाद युवा फोरमचे तरुण करीत आहेत. त्यांच्या या कामाविषयी श्री विकास पाठक यांनी आकाशवाणीला माहिती दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8