महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
7:47PM

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज ३९वा स्मृतिदिन

आकाशवाणी
महाराष्ट्राचे पहिले  मुख्यमंत्री यशवंतराव  चव्हाण  यांचा आज ३९वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना देशभरात अभिवादन केलं जात आहे. राज्यातही विविध उपक्रमाद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड इथल्या प्रीतिसंगमावर असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव  चव्हाण यांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. 

'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'त चव्हाण यांच्या साहित्याचं प्रदर्शन आयोजित  केलं आहे. त्यात यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिलेली अशी शंभर उत्तम निवडक पुस्तकं आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1