महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 24, 2022
7:26PM

मराठी भाषा भवन आणि उपकेंद्राच्या काम पंधरा दिवसांत सुरू होणार

आकाशवाणी
मुंबईत चर्नीरोड इथं मराठी भाषा भवन, आणि नवी मुंबईत ऐरोली इथं उपकेंद्र, अशा दोन्ही प्रस्तावित इमरतींच्या उभारणीचं काम येत्या दोन-तीन आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज ऐरोली इथल्या प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.

या दोन्ही इमारतींच्या उभारणीसाठी १५२ कोटी रूपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून कंत्राटदारही निश्चित झालेला आहे. ही दोन्ही कामं तातडीनं सुरू करण्याच्या दृष्टिनं कालच बैठक घेतली होती. त्यानुसार ही पाहणी करून येत्या पंधरा ते वीस दिवसांत काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

साहित्य संस्कृती मंडळ, भाषेवर आधारित मंडळं, मराठी भाषेवर अभ्यास करणारी वाड्मय मंडळं यांच्या अध्यक्षांची कार्यालयं ऐरोली इथे होणार आहेत. तर, मराठी भाषेचं ग्रंथालय, संशोधन केंद्र चर्नी रोड इथं होणार आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1