महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
11:19AM

मणिपूरमध्ये परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात

Air
 
मणिपूरमध्ये गेल्या ४८ तासांत हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नसून परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे, असं मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. खोऱ्यातल्या  पाच  जिल्ह्यांमध्ये बारा तास आणि शेजारच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये दहा तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. इतर सहा डोंगरी जिल्ह्यांमध्ये संचारबंदी नाही. आत्तापर्यंत ८९६ शस्त्रं आणि अकरा हजारांहून अधिक दारूगोळा तसंच विविध प्रकारचे दोनशे बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.मणिपूरमधील विस्थापित लोकांना दिलासा देण्यासाठी, गृह मंत्रालयानं एकशे एक कोटी रुपयांहून अधिक मदतीचं पॅकेज मंजूर केलं आहे. राज्य आणि केंद्रीय दलाच्या संयुक्त पथकानं राज्यातल्या अनेक भागात कोम्बिंग ऑपरेशन तीव्र केलं आहे,असं निवेदनात म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1