महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
12:05PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातलं सहकार्य हिंद प्रशांत क्षेत्रासाठी लाभदायक - डॉ.एस जयशंकर

AIR
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्र्यांची बैठक काल नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वाँग, संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, दुर्मिळ खनिजं, ऊर्जा, हवामान बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्परसंबंध या विषयांवर चर्चा झाली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले परस्परसंबंध वेगानं विकसित होत असून त्याचा क्षेत्रिय परिणामही मोठ्या प्रमाणात होत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड देशांमधल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाचं सहकार्य हिंद प्रशांत क्षेत्रासाठी फायदेशीर ठरत असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दोन्ही देश मिळून अन्य देशांमध्ये एकत्र कामाच्या संधींचा आढावा घेतील असं जयशंकर यांनी सांगितलं.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1