महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:30PM

फीफा विश्वचषकात पुर्तगाल ३-२ ने विजयी

आकाशवाणी

फीफा विश्वचषकात काल दोहा इथं एच गटात झालेल्या रोमांचक सामन्यात पुर्तगालनं ३-२ ने घानाला पराभूत केलं. पुर्तगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोनं स्पर्धेत पहिल्याच सामन्यात गोल करुन विश्‍वविक्रम रचला. २००६, २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ या पाच विश्वचषकात गोल करणारा तो पहिला फुटबॉलपटू बनला आहे.

जी गटाच्या दुसऱ्या एका सामन्यात ब्राजीलनं २-० ने सर्बियाला हरवत दमदार सुरुवात केली. तर उरुग्‍वे आणि दक्षिण कोरिया यांच्यातला सामना अनिर्णित राहिला. फुटबॉल विश्‍वचषकात आज तीन सामने खेळले जाणार आहेत. बी गटात वेल्‍स आणि ईराण यांच्यात लढत होईल, ए गटात कतर आणि सेनेगल यांच्यात सामना होईल तर नेदरलॅंडचा सामना इक्‍वाडोर बरोबर होणार आहे.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1