महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 24, 2023
8:37PM

जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारतानं आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

AIR
जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारतानं आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. 

आपल्या समृद्धीच्या काळात भारत सिल्क रूटसाठी ओळखला जायचा, त्याचप्रमाणे सध्याच्या आधुनिक काळात भारतानं जी ट्वेंटी परिषदेत भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडोअर प्रस्तावित केला आहे, हा मार्ग पुढची शेकडो वर्षं जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ ठरेल, आणि त्याची सुरुवात भारतीय भूमीवर झाल्याची नोंद इतिहासात कायम राहील असं ते म्हणाले. 

येत्या २६ सप्टेंबरला जी ट्वेंटी युनिवर्सिटी कनेक्ट हा उपक्रम राबवला जाणार आहे, देशभरातली विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्था यात सहभागी होणार आहेत, यामुळे देशभरातल्या विद्यापीठांमधले लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील, असं त्यांनी सांगितलं. 

चांद्रयान ३ चं यश आणि त्यांना देशवासियांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख प्रतिसादाचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. 

जी ट्वेंटींच्या यशस्वी आयोजनानं प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला. इस्रोच्या युट्यूब वाहिनीवरून ८० लाख लोकांनी चांद्रयान ३ चं प्रक्षेपण पाहीलं, यातून भारतीयांचं चांद्रयान ३ सोबतचं गहीरं नातं दिसून येतं असं ते म्हणाले. 

जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या काळात जगभरातले एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले, इथल्या विविधांगी संस्कृती, परंपरा आणि वारशाची त्यांना ओळख झाली, त्यांना मिळालेल्या या सुखद अनुभवामुळे देशातलं पर्यटन आणखी वाढीला लागेल, जी ट्वेंटीच्या या यशस्वी आयोजनानंतर जगभरात भारताबद्दलचं आकर्षण वाढलं आहे, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातल्या होयसाळ मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली, आता देशातल्या जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या ४२ झाली आहे, यापुढेही आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणं, जागतिक वारसा स्थळं म्हणून ओळखली जावीत हाच आपला प्रयत्न असेल, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी पर्यटनाला जाताना देशातली विविधता पाहण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख होईल आणि सोबतच स्थानिक लोकांचं उत्पन्नही वाढेल, असं आवाहन त्यांनी केलं. 

दिल्लीत जी ट्वेंटी परिषदेच्यावेळी आलेले जगभरातले नेते बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर एकत्र आले, त्यातून महात्मा गांधी यांचे विचार आजही जगासाठी उपयुक्त असल्याचं अधोरेखीत होतं, असं ते म्हणाले. गांधी जयंतीनिमित्त  आपल्या परिसरात स्वच्छता मोहिमेत एक दिवस एक तास द्यावा, ही स्वच्छता मोहीम म्हणजे गांधीजींना खरी आदरांजली असेल, असं त्यांनी सांगितलं. गांधी जयंतीच्या निमीत्तानं खादीची उत्पादनं खरेदी करावीत असं आवाहनही त्यांनी देशवासीयांना केलं. 

पुस्तकं वाचण्याचं महत्व सांगताना प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये नैनिताल इथल्या तरुण मुलांनी सुरु केलेल्या घोडा वाचनालय आणि हैदराबादमधल्या आकर्षणा सतीश या लहान मुलीच्या अभिनव उपक्रमांची माहितीही दिली. 

वन्य जीव आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी होत असलेल्या प्रेरणादायी प्रयत्नांची उदाहरणं त्यांनी  मांडली. 

स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ हा देशाप्रती कर्तव्याचाही काळ आहे, आपली कर्तव्यं पार पाडत असतानाच, आपण आपली वैयक्तिक उद्दिष्टही साध्य करू शकतो, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून जनतेला आगामी नवरात्र आणि दसरा सणाच्या शुभेच्छाही दिल्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1