महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
10:01AM

प्रधानमंत्री उत्तर प्रदेशातील वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला देणार भेट

AIR
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला आज भेट देणार आहेत. सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्चून उभारल्या जात असलेल्या विकास प्रकल्पांची ते सुरुवात करणार आहेत आणि विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. ते वाराणसीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. गंजरी इथं सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्चून तीस एकरांवर हे स्टेडियम उभारण्यात येत आहे. स्वरुपानंद संस्कृत विद्यालयात महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीनिमित्त नारीशक्ती वंदन अभिनंदन कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. काशी संसद सांस्कृतिक महोत्सतवाच्या सांगता कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ते या कार्यक्रमात १६ अटल आवासीय विद्यालयांचं उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी कोरोना साथीत अनाथ झालेल्या बांधकाम मजुरांच्या आणि कामगारांच्या मुलांसाठी सुमारे १११५ कोटी रुपये खर्चून या विद्यालयांची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आज सकाळी नवी दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. न्याय यंत्रणेतील वाढती आव्हानं अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1